संपादक : (उदयकुमार माधवराव देशमुख.)
अटल सेतू सारखे अनेक मोठे प्रकल्प भाजपाने आणले तरी देखील जनता वैयक्तिक कामच पाहत असते, पृथ्वीराज बाबांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी प्रस्थापितांच्या विरोधात साखर कारखाना सूतगिरणी सारख्या संस्था काढून अनेकांच्या चुली पेटवल्या आज ही ते संपूर्ण वेळ जनतेची सेवा करण्यात व्यस्त असतात त्यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी असताना त्यांनी केलेले कार्य हे भाजप पक्षाच्या कॅमेरात कैद झाले आहे, भाजपा कोणत्याही क्षणी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देतो त्याप्रमाणे रात्री अपरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा माझाही पृथ्वीराज बाबांना फोन येईल त्यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.
ते कडेपूर ता. कडेगाव येथे भाजपाचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्या वेळी बोलत होते.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिव पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, किरण तात्या लाड, जनता उद्योग समूहाचे राजेश पाटील, सातारा जिल्हा भाजपा माजी अध्यक्ष धैर्यशील कदम, युवा नेते रविराज दादा देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र चौगुले, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की बाबांनी प्रस्थापिरांच्या विरोधात वादळात दिवा लावला असून मिटत नसणारे वाद बाबांनी मिटवले आहेत भाजपाला बाबांची गरज असल्याचे पडळकर म्हणाले,

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार मा. पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांचा कडेपूर येथील निवासस्थानी मोठ्या जल्लोषात व पलूस कडेगावच्या जनतेस अनेक दिगजयांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
जिल्ह्याचे नेते मा. पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी आई देवयानी देशमुख , पत्नी वृषालीताई देशमुख, वहिनी शिवानीदेवी देशमुख, तसेच स्नुषा रुनालीराजे देशमुख यांनी औक्षण केले. पृथ्वीराज देशमुख यांनी सकाळी ८ वाजता डोंगराई देवीचे दर्शन घेऊन नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून पलूस कडेगावच्या जनतेस अनेक दिगजयांच्या उपस्थितीत उपस्थित केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, आबासाहेब देशमुख, पै. संतोष वेताळ, स्वप्निल पाटील, प्रसाद पाटील, सांगली जिल्हा मजूर फेडरेशन चे सर्व संचालक मंडळ, पलूस चे उद्योजक सर्जेराव नलवडे, शिवाजीराव मगर पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, कडेगाव उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले, कडेगाव तहसीलदार अजित शेलार, पलूस तहसीलदार दीप्ती रिठे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तर फोन वरून आ. जयंतराव पाटील, आ. अरुण लाड, विधानपरिषद आ. अमित गोरके, आ. सुधीरदादा गाडगीळ, आ. सुरेशभाऊ खाडे, आ. अतुलबाबा भोसले, खा. विशाल पाटील, मा. मंत्री शिवाजीराव नाईक, मा. आ. रोहित पाटील, मा. आ. बाळासाहेब पाटील, , मा. आ. विलासराव जगताप, मा. आ. अजितराव घोरपडे, महेंद्र लाड, माजी, राहुल महाडिक, समित कदम, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पाटील, शेखर इनामदार, अमरसिंह देशमुख, मनोज सगरे, श्रीपाद चितळे, नीताताई केळकर, यांसह अनेक कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज देशमुख यांना शुभेच्छा दिल्या.
कवठेमहांकाळ तालुक्यातून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे राज्य सरचिटणीस हायुम सावनुरकर, सभापती विकास हाक्के, मार्केट कमिटी सभापती दादासाहेब कोळेकर, मार्केट कमिटी संचालक महेश पवार, व्हि. टी. पाटील, गजानन कोठावळे, कवठेमहांकाळ भाजपा तालुका अध्यक्ष उदयराजे शिंदे, माजी उपसभापती अनिल शिंदे, जिल्हा सरचिटणीस अनिल लोंढे, संजय सगरे, पांडुरंग सगरे, यांच्यासह तालुक्यातील अनेक गावातून सर्वच पक्षातील प्रमुख कार्यकर्ते याची दिवसभर लक्षणीय उपस्थिती दिसत होती.

तसेच कडेगाव पलूस तालुक्यातून कडेपूर सरपंच सतीशराव देशमुख, दतात्रय सूर्यवंशी, कडेगाव पंचायत समिती सदस्य पूनम माळी, पलूस पंचायत समिती सदस्य आनंदराव कुराडे, प्रशांत दमामे, राजाराम पाटील, लक्ष्मन कणसे, बाबासो शिंदे, पलूस भाजपा अध्यक्ष पै. मिलिंद भैय्या पाटील, कडेगांवच्या उपनगराध्यक्षा रंजना लोखंडे, माजी उपनगराध्यक्ष पै.अमोल डांगे, नगरसेवक विजय गायकवाड, नगरसेवक निलेश लंगडे, नगरसेवक सुधाकर चव्हाण, नगरसेवक मुक्तार पटेल, नगरसेवक आशपाक पठाण, नगरसेवक हणमंत शिंदे, कडेगाव तालुका भाजपा अध्यक्ष विकास सूर्यवंशी, पलूस शहर चे अध्यक्ष संदीप मोरे, कडेगांव शहर चे अध्यक्ष संदीप गायकवाड, सुरज कडेगावांकर, इम्तियाज शेख, रवी घाडगे, सादिक इनामदार, नवाज तांबोळी, नईम पटेल, अभिजित पाटील, सागर सुतार, गणेश नलवडे, रामानंद पाटील, माजी सभापती मंगलताई क्षीरसागर, मंदाताई करांडे, रवींद्र कांबळे, विजय करांडे, विजयसिंह देशमुख, बाबजी यादव, आनंदराव डोंब, संजय येसुगडे, जयदीप यादव, प्रकाश गढळे, सरपंच अर्चना घाडगे, रामानंद पाटील, दादा घार्गे, प्रकाश मांगलेकर, सुनील जाधव, विजयअण्णा चोपडे, सावंतपूर सरपंच प्रल्हाद जाधव, बाळासाहेब यादव, इंद्रजीत पाटील, दीपक पाटील राजेंद्र लाड, महेंद्र पवार, अंकुश यादव, संदीप यादव, हनमंत थोरात, विनोद सूर्यवंशी, डॉ. सुरज बाबर, यांच्यसह अनेक कार्यकर्त्यांनी शुभेछ्या दिल्या.
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व एकनाथ शिंदे, मंत्री छ. शिवेंद्रराजे भोसले, मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. रवींद्र चव्हाण, खा. छ. उदयनराजे भोसले यांनी सकाळी फोनवरून शुभेच्छा दिल्या.

कडेपूर ता. कडेगांव येथे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुभेच्छा देताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिव पाटील,जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शरद लाड, वृषाली देशमुख, रविराज देशमुख, ऋनालीराजे भोसले-देशमुख, उदयकुमार देशमुख यांच्यासह अन्य.
