कडेगाव : प्रतिनिधी.
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या कडेगाव शहराच्या चौफेर विकासाठी विविध विकास कमांसाठी दिलेला प्रस्ताव मंजूर करून विकासकामांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कडेगाव नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख यांनी मुंबई मंत्रालय या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या समवेत भेट घेतली. यावेळी उदयकुमार देशमुख यांनी फडणवीस यांना निवेदन दिले.
सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशमुख यांची भेट महत्वपूर्ण ठरली आहे. या भेटीत देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी शहरांच्या विविध प्रश्नांवर प्राथमिक चर्चा केली. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा विलगीकरण व शहराच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांचे त्यांनी लक्ष वेधले शहराच्या आरोग्य, स्वच्छता व शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी भरीव निधी देऊन नगरपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्याचे जाळे अधिक भक्कम आणि दर्जेदार करण्यासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली असून कडेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त विकासनिधी देण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख यांना दिला.

कडेगांव: मंत्रालय मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या समवेत चर्चा करताना माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख.
