कडेगाव वार्ताहर
आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार दिवंगत आमदार लोकनेते स्व. संपतरावजी देशमुख आण्णा यांना ३० व्या. स्मृती दिनानिमित्त “संकल्पसिद्ध” प्रेरणास्थळ कराड विटा रोड एमआयडीसी शिवाजीनगर, ता. कडेगाव येथे अभिवादन करण्यात आले. “संकल्पसिद्ध” प्रेरणास्थळ येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झाले.

सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख, जयदीप देशमुख, ग्रीन पॉवर शुगर्स गोपूजच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख, रूपाली देशमुख,मनीषा देशमुख, विश्वतेज देशमुख, शिवतेज देशमुख,जयराज देशमुख, स्वराताई देशमुख यांच्यासह कुटुंबीयांनी आदरांजली वाहिली.

दिवंगत आमदार संपतरावजी देशमुख यांनी नेहमीच सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण, समाजकारण केले, तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली. “मंत्रीपद नको पाणी द्या मला मंत्रीपद नको माझ्या भागाला पाणी द्या” जेणेकरून कायम दुष्काळी पट्टा असणारा माझा भाग सुजलाम सुफलाम होईल म्हणुन.२० ऑक्टोंबर १९९५ साली तात्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या शुभहस्ते टेंभू योजना मंजूर केली. आशिया खंडातील पहिली सर्वात मोठी पाणी लिफ्ट योजना सांगली, सातारा, सोलापूर या दुष्काळी जिल्ह्यांना अगदी सांगोल्याच्या टोकापर्यंत निर्जीव जमिनीस जीवन देणारी योजना. ज्या योजनेमुळे आज सर्वत्र ओसाड माळरानाने हिरवा शालू परिधान केला त्याच योजनेचे जनक,शिल्पकार स्व.आमदार संपतरावजी देशमुख आण्णा त्यांच्या विचाराचा वारसा जोपासत देशमुख कुटुंबीयांची वाटचाल सुरू आहे.

“संकल्पसिद्ध” ‘प्रेरणास्थळ’ शिवाजीनगर, ता. कडेगाव या ठिकाणी माजी खासदार संजय पाटील, आमदार डॉ.अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार सदाशिव पाटील, शिवसेना नेते डब्बल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, रणधीर नाईक, राजाराम गरुड, प्रांताधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार अजित शेलार, बंडोपंत राजउपाध्ये, राजाराम गरुड, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, पंचायत समिती सदस्य पूनम माळी, भाजपा तालुकाध्यक्ष कडेगाव विकास सूर्यवंशी, शहराध्यक्ष संदीप गायकवाड,शिवसेना कडेगांव तालुकाध्यक्ष प्रदीप कदम, निलेश येसुगडे, नगरसेवक दिगंबर पाटील,नगरसेवक विजय गायकवाड, नगरसेवक निलेश लंगडे, नगरसेवक, गणेश भोसले, नगरसेविका विद्या खाडे, नगरसेविका मनीषा राजपूत, डी.एस देशमुख, जिल्हा संघ चालक डॉ. मकरंद बर्वे, महेंद्र पवार, शिवाजी नाना मगर पाटील , रोहित नाना पाटील , दत्तात्रय उथले , उमेश पाटील , राजेंद्र लाड , प्रताप लाड , सत्यवान आप्पा सूर्यवंशी , प्रमोद दादा मिठारी , दिलीप पाटील , बाबू नाना खांडेकर , उमेश तात्या लाड ,विजय खाडे, हिम्मत देशमुख, संभाजी पाटील, डी. एस.देशमुख, माणिक मोरे,बापुराव पवार, विशाल सूर्यवंशी, लक्ष्मण कणसे, सुशांत महाडिक, हणमंतराव कदम, चंद्रकांत पाटील, सतीश जाधव, आबासाहेब करांडे, सयाजी चव्हाण, सतीश जाधव, बापुराव पवार, संजय पवार, राजू मुलाणी, अशोक साळुंखे, अनुप पवार, सुधीर पाटील,सतिश चौगुले , पोपट संकपाळ , सारंग माने , रणजीत यादव , विजय काका पाटील , रवींद्र कांबळे,महेश सावंत, पोपट कळके, रवी देशमुख,अँड महेश शानभाग,अशोकराव पाटील,सुनीलराव ताटे,साहेबराव काळेभाग,संतोष राव भिंगार देवी, प्रवीण शिंदे, नितीन बाबा नवले , रमेश पाटील , मुनीरखान पठाण , लोकनेते स्व.आमदार संपतरावजी देशमुख यांना “संकल्पसिद्ध प्रेरणास्थळी” अभिवादन

