कडेगांव : वार्ताहर
कडेगांव तालुक्यातील तूपेवाडी खेराडे येथील येरळानदी पात्रालगत असणाऱ्या महादेव मंदिरातील चोरलेले चांदीचे दागिने विक्रीसाठी आटपाडी येथे येत असलेल्या चार आरोपींना कडेगांव व आटपाडी पोलिसांच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून २८ लाख २२ हजार ५०० रुपयांचे ११ किलो ९०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत, लक्ष्मण अण्णा चौगुले वय २९, गुड्डू यंकाप्पा जेडपे वय ३०, परशुराम तीमन्ना इटकर वय ३४, विधी संघर्ष गस्त बालक सर्व राहणार बजरंगनगर विटा, ता. खानापूर जिल्हा सांगली असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
तूपेवाडी खेराडे, ता. कडेगांव येथील येरळा नदीपात्रा लगत असणाऱ्या महादेव मंदिरातील चांदीचे दागिने दि.२८ एप्रिल रात्री २ ते २९ एप्रिल सकाळी ६ वा. सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चांदीचे दागिणे अज्ञात चोरटयाने घरफोडी करुन चोरुन नेल्याची फिर्याद तानाजी दामू गुजले यांनी दिल्याने त्यांच्या तक्रारीवरुन कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एस. कांबळे करत होते.
पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी मालमत्तेविरुध्दच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन मालमत्ते विरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या असल्याने कडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी कडेगाव पोलीस ठाणेकडील पोलीस पथक नेमुन त्यांना मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचित केले होते, सदर गुन्हा दाखल झालेपासुन गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोधन्याचा प्रयत्न चालु असताना, गोपनीय बातमीदारा मार्फत सदरचे दागिने आटपाडी येथे विक्री करीता आले असलेबाबत माहिती आटपाडी पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकाचे पो.उपनिरीक्षक खरात, पो. हेकॉ १८६० ठोंबरे, पोहे.कॉ २०५५ बोडखे, पोशि ५१२ सचिन सुर्वे यांचेकडुन कडेगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस उपनिरीक्षक उदयसिंह देशमुख यांना मिळाल्याने कडेगाव पोलीसाचे पथक तात्काळ आटपाडी येथे रवाना झाले, पोलिस पथकाने आटपाडी येथे सापळा रचला असता पोलिसांनी चारही आरोपींना दागिन्यांसह ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक तुषार दोषी,अपर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बी एस कांबळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक उदयसिंह देशमुख, पोहेकॉ.अमोल नायर, पोहेकॉ.विजय घागरे, पोकॉ.अमोल जाधव, पोकॉ.लियाकत शेख आदीच्या पथकाने केली.

कडेगांव पोलीस ठाण्यात तुपेवाडी खे.येथील महादेव मंदिरातील २२ लाखांचे दागिने चोरणारे जेरबंद करण्यात आले यावेळी कडेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी आदी.
