कडेगाव : प्रतिनिधी.

कडेगाव शहरातील नगरपंचायत इमारत ही ग्रामपंचायत कार्यकाळातील असल्याने नगरपंचायत प्रशासन कार्य कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने नगरपंचायतीसाठी सर्व सोयी सुविधायुक्त इमारत होऊन शहरातील नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी भाजपाचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व शिवसेनेचे नेते डब्बल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यातून दि.५ में रोजी नगर विकास मंत्रालयामार्फत इमारतीच्या निधी संदर्भातील शुद्धिपत्रक जाहीर करण्यात आले असून कडेगाव नगरपंचायतीच्या नवीन प्रशस्त इमारत बांधकामासाठी ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती कडेगांवचे विद्यमान नगराध्यक्ष धनंजय चंद्रसेन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना नगराध्यक्ष धनंजय देशमुख म्हणाले की
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे,उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्याने नगरपंचायतिची इमारत प्रशस्त व सर्व सोयी सुविधा युक्त अशी वैशिष्ट्यपूर्ण व्हावी यासाठी ५ कोटी कोटींची निधीं मंजूर झाला असून लवकरच इमारत बांधकामाचे काम सुरू होणार आल्याची माहिती कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी दिली.
धनंजय देशमुख हे सर्वसमावेशक नेतृत्व
” कडेगाव नगरपंचायतीचे लोकप्रिय नगराध्यक्ष यांनी शहरातील सर्व समाजांना सोबत घेऊन सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून शहराचा कारभार सर्वसमावेशक केला.”
शिवलिंग सोनवणे…(जिल्हाध्यक्ष बसपा.)
कडेगांव शहराच्या सौंदर्यात भर
” कडेगाव चे लोकप्रिय नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी भाजपा महायुती सरकार च्या माध्यमातून नगरपंचायत प्रशस्त व्हावी यासाठी पाच कोटीचा मोठा निधी आणला, त्यामळे प्रशस्त अशी नगरपंचायत इमारत कडेगाव शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडेल “
……प्रमोद लोखंडे….(व्यापारी कडेगांव )
