कडेगाव/ प्रतिनिधी.
कडेगाव शहरातील अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत असलेल्या शुक्रवार पेठेतील धर्मवीर संभाजीराजे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीची नागरिक व व्यापाऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती. अखेर नगरपंचायतीने विशेष पुढाकार घेत या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असून नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्याचबरोबर कराड हायवे रोडवरील पंचायत समिती ते सुरेश बाबा देशमुख चौक हा महत्त्वाचा रस्तादेखील विशेष घटक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला असून कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैय्या यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून शहरातील व्यापारी, वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना खराब रस्त्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा अपघाताच्या घटना घडत होत्या. मात्र आता या रस्ता विकासकामांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून वाहतुकीची समस्या देखील सुटणार आहे.

नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेतल्याने विरोधकांच्या टीकेला प्रत्यक्ष कामातून उत्तर मिळाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. “काम कमी आणि टीका जास्त” करणाऱ्यांना विकासकामांनी चपराक बसल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.विशेष म्हणजे, काही विरोधकांकडून या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न झाले असतानाही नगरपंचायतीने विकासाचा वेग कायम ठेवला आहे. त्यामुळे “विकासाला विरोध करणाऱ्यांपेक्षा विकास करणाऱ्यांवरच जनता विश्वास ठेवते,” अशी चर्चा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या कामांमुळे शुक्रवार पेठ, कराड हायवे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, कडेगाव नगरीतील दक्ष नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून नगरपंचायत उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कडेगाव शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे आगामी काळात आणखी विविध सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैय्या यांनी व्यक्त केला. शहर विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.“टीका करणारे अनेक आले; पण रस्ते मात्र विकासाभिमुख नेतृत्वानेच केले,” अशा शब्दांत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत नगरपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक केले आहे.

“..कडेगाव येथील धर्मविर छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक काम सुरू असताना उपस्थित मान्यवर…”