कडेपूर : वार्ताहर.
कडेपूर ता. कडेगांव येथील सरस्वती स्कूल ने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यंदाही उज्ज्वल यश संपादन करत १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला.तसेच कडेगाव केंद्रातून शाळेची विद्यार्थिनी अनुष्का गायकवाड हिने ९९.२०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.यामध्ये अनुष्का गायकवाड हिने ९९.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सिद्धी मुळीक हिने ९६.८% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर सई पवार हिने ९५.२% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संस्थापक माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, संस्थेचे चेअरमन रविराज देशमुख, संस्थेच्या सचिव वृषाली देशमुख तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुमिता सूर्यवंशी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी शिक्षक व पालकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. सरस्वती स्कूलच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

