कडेगांव : वार्ताहर.
कडेगांव शहरातील मुख्य बाजारपेठ कॅनॉल परिसराचे श्री अंबिका चौक असे नामकरण करण्याचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे कडेगाव शहर उपाध्यक्ष युवा नेते राहुल राजाराम जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी केले असून श्री अंबिका चौकाचे नामकरण ठराव करून त्याची तात्काळ इतिवृत्तात नोंद घ्यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी निवेदन स्वीकारून निवेदनाची नोंद घेऊन नामांतरण करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की कडेगाव शहरातील मुख्य पेठेतील कॅनॉल जवळील हिरकणी ज्वेलर्स, शिवप्रसाद कलेक्शन यांच्यासमोरील कराड-विटा रोड पश्चिमेकडून येणारा रस्ता व उत्तरेकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक मधून येणारा रस्ता व दक्षिणेकडून छत्रपती संभाजी महाराज चौकामधून येणारा रस्ता व पूर्वेकडून राजाराम जगन्नाथ जाधव यांच्या घरापासून कॅनॉल वरील येणारा रस्ता या चारही रस्त्यांचा चौक तयार होत असून त्यास श्री अंबिका चौक असे नाव देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी भाजपाचे कडेगाव शहर उपाध्यक्ष युवा नेते राहुल जाधव, सदाम इनामदार, सोहम माने, दीपक पाटोळे, आशिष माने, अक्षय जाधव यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनामध्ये मुख्य बाजारपेठेतील कॅनॉल चौकाला श्री अंबिका चौक नामकरण करण्याचे निवेदन नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांना देताना भाजपाचे कडेगाव शहर उपाध्यक्ष राहुल जाधव, सद्दाम इनामदार यांच्या सह अन्न.
