कडेगांव : प्रतिनिधी.
अपशिंगे सर्व सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक पार पडली या निवडणुकीत काँग्रेसच्या जोतिर्लिंग शेतकरी विकास पॅनलने भाजप गटाच्या पॅनलचा धुव्वा उडवत सोसायटीत गड अभेद्य राखण्यात यश मिळवले आहे. निवडणुकीत एकूण १२ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली या मध्ये सर्वच्या सर्व जागांवर काँग्रेसच्या जोतिर्लिंग शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय घोषित करण्यात आले. निकालानंतर काँग्रेसच्या जोतिर्लिंग शेतकरी विकास पॅनलच्या शेतकरी सभासद कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करत जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.
निकालानंतर दिवंगत नेते स्व.पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ समाधीस्थळी जाऊन नूतन संचालकांनी अभिवादन केले,
विजयी उमेदवारांचे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम, सागरेश्वर सुतगिरणीचे चेअरमन शांतारामबापू कदम, कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. जितेश कदम, कडेगाव पंचायत समिती सदस्य दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच भारत सूर्यवंशी, नामदेव सूर्यवंशी, धोंडीराम सूर्यवंशी, आनंदराव सूर्यवंशी,अशोक साळुंखे, टी.जी.सूर्यवंशी, शौकत शेख, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला सांगली जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, श्रीमंत सूर्यवंशी, हरिभाऊ सूर्यवंशी, तुकाराम सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, नारायन सूर्यवंशी, सर्जेराव सूर्यवंशी, अंकुश कुंभार, प्रशांत अपशिंगेकर, रविराज सूर्यवंशी, दीपराज सूर्यवंशी, संदीप जाधव, किसन सूर्यवंशी, विश्वनाथ सूर्यवंशी, जगन साठे, दिनकर साठे, संग्राम सूर्यवंशी, सयाजी सूर्यवंशी, निलेश सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी,आशिष लोंढे, संदेश साठे यांच्या सह सर्व शेतकरी सभासद ग्रामस्थ उपस्थित होते.
” ज्योतिर्लिंग शेतकरी विकास पॅनलचे,
विजय उमेदवार “
१). धनाजी अधिकराव सूर्यवंशी
२). कुंडलिक सीताराम सूर्यवंशी
३). हणमंत गणपती सूर्यवंशी
४). संजय नाथा ननवरे
५). दिलीप उत्तम साळुंखे
६). गणेश संभाजी सूर्यवंशी
७). झुंझार रामचंद्र सूर्यवंशी
८). हेमंत सुरेश सूर्यवंशी
९). कांताबाई भगवान सूर्यवंशी
१०). शारदा चंद्रकांत सूर्यवंशी
११). हरिभाऊ रामचंद्र साखरे
१२). भास्कर हरी साठे

अपशिंगे येथील सोसायटी निवडणूक निकालानंतर विजय उमेदवारांसमवेत काँग्रेसच्या जोतिर्लिंग शेतकरी विकास पॅनल प्रमुख भारत सूर्यवंशी, नामदेव सूर्यवंशी, शौकत शेख, सुष्मिता जाधव, धोंडीराम सूर्यवंशी, आनंदराव सूर्यवंशी यांच्या सह सभासद शेतकरी आदी…….
