कडेगाव : प्रतिनिधी.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची एक्सप्रेस आता सुसाट झाली आहे. पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील हे राज्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक असून पलूस-कडेगाव मधील प्रत्येक वाडी-वस्तीवरील दर्जेदार रस्त्यांमुळे नागरिकांना सुरक्षित, सुकर व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होतअसल्याने शेतकरी बांधवांच्या दळणवळणास मोठा हातभार लागणार आहे. दर्जेदार रस्ते हेच विकासाचे मजबूत पाऊल असल्याने परिसराच्या विकासाला निश्चितच नवी चालना मिळून प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी लागेल तितका निधी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी खेचून आणत पलूस कडेगाव चा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव देशमुख यांनी केले.
ते उपाळे (मायणी) ता. कडेगाव येथील रस्ता सुधारणा करणे या त्यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या २४.७९ लक्ष रुपयांच्या विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते विलास अभंग (आप्पा), सोसायटीचे चेअरमन शंकर (अण्णा) घार्गे, हणमंतराव कदम (नाना), सरपंच बापुराव माने, उपसरपंच सागर घार्गे , दत्तात्रय घार्गे (अण्णा), सोसायटी चेअरमनआनंदराव कदम, क्डेगांव तालुका भाजप उपाध्यक्ष सिद्धनाथ घार्गे, उपाळे वांगीचे माजी सरपंच संजय माने, येडे उपाळेचे उपसरपंच संभाजी बाबर, उपाळे वांगीचे उपसरपंच संभाजी पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी इजीमा क. ५० ते उपाळे (मायणी), ता. कडेगांव येथील कदम मळा रस्ता, ग्रा.मा. ५७ कि.मी. ०/०० ते २/५०० रस्ता सुधारणा करणे या २४.७९ लक्ष किमतीच्या संग्रामसिंह संपतराव देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या रस्त्याचे लोकार्पणसंग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आप्पासो घार्गे, दीपक कदम, कालिदास कदम, भाऊसाहेब घार्गे, शहाजी घार्गे, दत्तात्रय घार्गे, माजी सरपंच जालिंदर घार्गे, प्रशांत कदम, सुदाम कदम, विकास माने, सतीश यादव, हिंदुराव यादव, संग्राम घार्गे, रोहित घार्गे, सत्यवान रेणुशे, संजय पवार, सुशांत काटकर, बाळासो घार्गे, सुनील मोहिते, सर्जेराव मोहिते, अभय घार्गे, प्रविण माळी यांच्यासह परिसरातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपाळे मायणी, ता.कडेगांव येथे संग्रामसिंह संपतराव देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या २४.७८लक्ष रुपयांच्या रस्ता सुधारणा करणे या विकास कामांच्या लोकार्पणाप्रसंगी संग्राम संपतराव देशमुख यांच्या सह अन्य.
