कडेगाव : प्रतिनिधी.
कडेगांव नगरपंचायतीवर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची एक हाती निर्विवाद सत्ता असल्याने. भाजपाचे स्वीकृत नगरसेवक हनमंत शिंदे यांनी ठरलेल्या कालावधी प्रमाणे राजीनामा दिल्याने कडेगांवचे भाजपाचे लोकप्रिय नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी गटनेते म्हणून स्वीकृत नगरसेवकपदी गणेश भोसले यांची शिफारसकेली होती. धनंजय देशमुख यांनी कोणताही राजकीय वारसा नसलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पेंटर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या गणेश भोसले यांना स्वीकृत नगरसेवक पदी संधी देऊन खऱ्या अर्थाने शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय व समतेच्या विचारांना न्याय देण्याची भूमिका घेतल्याने तळा गाळातील कार्यकर्त्यांना नवी दिशा निर्माण झाली असून सामाजिक समतेचा आदर्श निर्माण करत सर्व समावेशक नेतृत्वाचा आदर्श धनंजय देशमुख यांनी निर्माण केला आहे. स्वीकृत नगरसेवकपदी गणेश भोसले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडीचे पिठासीन अधिकारी डॉ. रणजीत भोसले, तर सहाय्यक म्हणुन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.पवन म्हेत्रे यांनी काम पाहिले. स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे गणेश भोसले यांची निवड झाल्याचे प्रांताधिकारी डॉ.रणजीत भोसले यांनी जाहीर केले.

यावेळी उपनगराध्यक्षा रंजना लोखंडे,बांधकाम सभापती पै.अमोल डांगे,आरोग्य सभापती निलेश लंगडे, महिला व बालकल्याण सभापती शुभदा देशमुख, उपसभापती मनीषा राजपूत, विरोधी पक्ष नेते विजय शिंदे, नगरसेवक विजय गायकवाड,मनोज मिसाळ, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख,कडेगाव शहर अध्यक्ष संदीप उर्फ दादा गायकवाड, नगरसेविका विद्या खाडे, नजमाबी पठाण, नाजनीन पटेल, दीपा चव्हाण, किशोर मिसाळ, महेश भोसले, रमेश भोसले वैभव भोसले रुपेश चौगुले शाहीर चौगुले बाळू चौगुले अधिक मोरे कृष्ण चौगुले नितीन चौगुले प्रकाश भोसले, अमरापूरचे सचिन भोसले संदीप भोसले राजेश भोसले पवन चौगुले यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
‘ धनंजय देशमुख यांनी सर्वसमावेशक नेतृत्वाचा आदर्श निर्माण केला.’
“….कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी शहरातील प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम केले असून माझ्यासारख्या सर्वसामान्य तळागाळातील पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्याला नगरसेवक पदी काम करण्याची संधी देऊन शिव, शाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचा वारसा जोपासत सर्वसमावेशक नेतृत्वाचा आदर्श निर्माण केला….”
…..नगरसेवक गणेश भोसले…..
नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक,
कडेगाव नगरपंचायत.

