कडेगांव : वार्ताहर.
राजकारणापलीकडे गट-तट,जात-पात न पाहता संपूर्ण कडेगांव आपले कुटुंब समजून कडेगावचे दिवंगत नेते स्व.आनंदराव देशमुख, स्व.गुलाबराव देशमुख, स्व.सुरेश (बाबा) देशमुख व चंद्रसेन देशमुख यांनी लोकसेवा करून माणसे कमावली त्यांचाच वारसा जोपासत “संपूर्ण कडेगाव शहर माझे कुटुंब ” समजून रात्री अपरात्री जनतेसाठी उपलब्ध राहून लोकसेवा करत असल्याने कडेगांवकरानी दिलेल्या मतदानरूपी आशीर्वादामुळे नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आता गल्ली पासून दिल्ली पर्यंत भाजपचे सरकार आहे, त्यामुळे कडेगावातील प्रत्येक प्रभागातील सर्वसामान्य नागरिकाना निराधार पेन्शन, स्वानिधी,घरकुल सोबत प्रधानमंत्री व नमो शेतकरी सन्मान निधी, महिलांच्या विविध कलागुणांना व्यवसायातून चालना देण्यासाठी शासकीय योजना,दिव्यांगांसाठी अन्य लोककल्याणकारी वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबर नगरपंचायतीकडून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठा विकासनिधी उपलब्ध करून शेवटच्या श्वासापर्यंत कडेगावकरांची सेवा करणार असल्याचे प्रतिपादन कडेगांवचे विद्यमान नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले.

ते कडेगांव शहरातील प्रभाग ७ व ११ मधील विविध विकासकामांच्या भूमिपूजना प्रसंगी बोलत होते.

प्रभाग क्रमांक ७ मधील विविध विकासकामांच्या भूमिपूजना प्रसंगी नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्यासह अन्य.
यावेळी उपनगराध्यक्ष रंजना लोखंडे, बांधकाम सभापती पै. अमोल डांगे, आरोग्य सभापती निलेश लंगडे, नगरसेविका शुभदा देशमुख,नगरसेविका नजमाबी पठाण प्रमुख उपस्थित होत्या.

यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजनमधून मंजूर झालेल्या शहरातील प्रभाग ७ मधील चंद्रसेन देशमुख यांच्या घरापासून संदीप माने घरापर्यंत व प्रताप भोई घर ते दत्तात्रय यादव घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व पाईप गटार करणे, प्रभाग ११ मधील पवार नगर ते गुहागर विजापूर महामार्गापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व पाईप गटार करणे या विकासकामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी नगरसेवक विजय गायकवाड, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष संदीप गायकवाड, आशपाक पठाण, हाजी मूकतार पटेल, सुधाकर चव्हाण, चंद्रहास्य देशमुख, श्रीजय देशमुख, रवींद्र पवार, अभिजित लोखंडे, रमेश पवार, सतीश पवार, विलास पवार, गणेश देशमुख, अक्षय देशमुख, अक्षय पवार, सचिन आनंदा पवार, अशोक पवार, महेश पवार, मनोज भस्मे, शिवाजी देसाई, महेश पाटील, संभाजी देसाई, शांताराम दीक्षित, जगदीश लोखंडे, किशोर मिसाळ, दत्ता शिंदे, वैभव भोसले, रोहित चन्ने, दिग्विजय देशमुख, रोहित देशमुख, सुरज देशमुख, प्रकाश मोरे, लाला निकम यांच्या सह कडेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
“धनंजय देशमुख यांनी प्रत्येक वाडी वस्तीचा विकास केला.
” कडेगाव चे लोकप्रिय नगराध्यक्ष धनंजय देशमुख हे “संपूर्ण कडेगाव शहर माझे कुटुंब ” समजून कडेगावचा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास करत आहेत स्वतंत्र काळापासून पवारनगरला रस्ता नव्हता, पावसाळ्यात तारेवरची कसरत या रस्त्यावरून नागरिकांना करावी लागत होती. अनेक ग्रामपंचायती झाल्या त्यानंतर नगरपंचायत स्थापन झाली तरीदेखील हा रस्ता झाला नाही नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी हा रस्ता मंजूर करून वचनपूर्ती केली.”
–श्री. रवींद्र पवार.
कडेगाव तालुकाध्यक्ष नाभिक समाज.

