अमरापूर प्रतिनिधी.
मा.आ.पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यासह पलूस कडेगाव तालुक्यात विविध उपक्रम साजरे करण्यात आले अमरापूर येथील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजपाचे ओबीसी मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष प्रकाश गढळे व अमरापुरच्या लोकनियुक्त सरपंचा सुनिता गडळे यांनी अमरापूर ता. कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना तर अंगणवाडी मधील चिमुकल्यांना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करून सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून वाढदिवस साजरा केला.
यावेळी उपसरपंच महादेव रुपनर, भानुदास काकडे, विनोद मोरे, आनंदराव मोरे, अमोल माने यांच्या सह मोठ्या संख्येने शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

अमरापुर ता कडेगाव येथे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना खाऊ वाटप करताना प्रकाश गडळे, लोकनियुक्त सरपंच सुनीता गढळे यांच्या सह अन्य..
