कडेगांव नगरपंचायतीच्या निवडणुकीत कडेगांव शहरवासियानी मोठ्या विश्वासाने कडेगाव नगरपंचायतीची सत्ता भाजपाल दिली होती. शहरवासीयांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठे ही गाल बोट न लागता माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता केली असून शहरात सध्या रस्ता कॉंक्रिटीकरण, आरसीसी गटार बांधकाम पेव्हिंग ब्लॉक बसविण्याची कामे चालू असून शहरातील एकही विकासकाम प्रलंबित न ठेवता शहराला लवकरच सर्व सोयी सुविधायुक्त स्मार्ट सिटी करण्याचा माणस असल्याचे प्रतिपादन कडेगांवचे विद्यमान नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले ते कडेगांव शहरातील प्रभाग क्रमांक १६ व १७ मधील मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्ष रंजना लोखंडे, सार्व.बांधकाम सभापती पै.अमोल डांगे,आरोग्य सभापती निलेश लंगडे, नगरसेवक विजय गायकवाड, हाजी मुख्तार पटेल, नगरसेविका मनिषा राजपूत, भाजपाचे शहराध्यक्ष संदीप गायकवाड प्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रभाग १७ मधील महेश भोसले घर ते हणमंत मिस्त्री घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे १४ लक्ष व प्रभाग १६ मधील गिरी गोसावी घर ते खुडे घरापर्यंत पाईपलाईन गटार व रस्ता काँक्रिटीकरण करणे १४ लक्ष अशा २८ लक्ष रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी नगरसेवक सुधाकर चव्हाण, यूवराज राजपूत, माजी नगरसेवक हणमंत शिंदे, राकेश जरग, इंद्रजित पवार, जितेंद्र देशमुख, महेश भोसले, हणमंत रासकर, बाळू चौगुले, वैभव भोसले, रोहित चन्ने, दिग्विजय देशमुख यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

कडेगांव शहरातील प्रभाग १६ व १७ मधील विकास कामांचे भूमीपूजन करताना कडेगांवचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष रंजना लोखंडे, सभापती अमोल डांगे, सभापती निलेश लंगडे, नगरसेवक हाजी मुख्तार पटेल, भाजपाचे शहराध्यक्ष संदीप गायकवाड याच्यासह अन्य.
