दैनिक वचक : संपादक.
कडेगांवचे आराध्य दैवत श्री जोतिबा व श्री हनुमान यात्रेच्या शुभमुहूर्तावर दै.वचक या डिजिटल मॅक्झिनचे लोकार्पण कडेगाव शहराचे विद्यमान नगराध्यक्ष धनंजय देशमुख (भैय्या), यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी उपनगराध्यक्ष पै.अमोल डांगे, नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते विजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम निलेश लंगडे, आरोग्य सभापती विजय(आप्पा)गायकवाड ,नगरसेवक हाजी मुक्तार पटेल, माजी उपनगराध्यक्ष साजिद पाटील, VD डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा श्रीजय देशमुख, नगरसेवक सुधाकर चव्हाण, जिल्हा परिषद उर्दू शाळा स्कूल कमिटी अध्यक्ष इम्तियाज उर्फ बाळूभैय शेख, भाजपा गुंठेवारी समिती सांगली जिल्हाध्यक्ष रविराज घाडगे, सह्याद्री प्रिंटिंग प्रेस चे सर्वेसर्वा प्रकाश नलवडे(काका), रिअल इस्टेट उद्योजक प्रकाश निरंजन, आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जगदीश (बापू)लोखंडे, जगदंब टाइल्स चे प्रोप्रा संभाजी देसाई, नगरसेवक अभिजित लोखंडे, इंजिनिअर शुभम राजपूत, दैनिक वचकचे संपादक माजी नगरसेवक उदयकुमार (तात्या) देशमुख, उपसंपादक परवेझ तांबोळी प्रमुख उपस्थित होते.

कडेगांवचे आराध्य दैवत श्री जोतिबा व श्री हनुमान यात्रेच्या शुभमुहूर्तावर कडेगांव येथील आराध्य दैवत श्री जोतिबा मंदिर या ठिकाणी “अन्यायाचा कर्दनकाळ दैनिक वचक” या पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले.
कडेगाव शहर परिसर व सांगली जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय किंवा वैयक्तिक स्तरावर महिलांवरील अत्याचार, हुंडाबळी,घरगुती हिंसां मानसिकत्रासा विरोधात, महिलांनासन्मान मिळवून देण्यासाठी, लोकसेवक, पैलवान, खेळाडू, शेतकरी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी जुलमी धोरणांच्या विरोधात केली जाणारी आंदोलने,उपोषणे प्रकाशज्योतात आणून गैरवर्तन, भ्रष्टाचार विरुद्ध किंवा अन्यायाविरुद्ध निर्भीड व निष्पक्ष लेखणीद्वारे प्रत्यक्ष कृतीतून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी अन्यायाचा कर्दनकाळ म्हणून “संपादक उदयकुमार देशमुख ” यांनी दैनिक वचक या डिजिटल मॅक्झिन पोर्टलची स्थापना केली असून यापुढे कोणत्याही व्यक्ती, समाजावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्यास अन्यायाचा कर्दनकाळ असणाऱ्या दैनिक वचक संपादक,उपसंपादक यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान उपसंपादक परवेझ तांबोळी यांनी केले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून महिला सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणारा असण्याची ग्वाही संपादक उदयकुमार देशमुख यांनी दिली.

कडेगांव येथील श्री ज्योतिबा मंदिर या ठिकाणी “अन्यायाचा कर्दनकाळ दैनिक वचक” या डिजिटल मॅक्झिन पोर्टलचे लोकार्पण करताना कडेगांवचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष पै.अमोल डांगे, विरोधी पक्षनेते विजय शिंदे दैनिक वचक चे संपादक उदयकुमार देशमुख, उपसंपादक परवेझ तांबोळी आदी.

