कडेगांव : प्रतिनिधी.
कडेगाव शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहाने साजरी करण्यात आली. यानिमित्त कडेगाव निमसोडरोड येथील इदगाह मैदनावर मुस्लिम बांधवांच्या वतीने सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली .यावेळी विश्वशांतीसाठी तसेच सर्वच धर्मात, जाती पातीमध्ये एकोपा कायम रहावा,महामारी सारखे आजार दूर व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.
कडेगाव शहरासह कडेपूर, शाळगाव, वांगी, अमरापूर, देवराष्ट्रे, चिंचणी, नेर्ली, तडसर आदी गावासह संपूर्ण तालुक्यात रमजान ईद उत्साहाने साजरी करण्यात आली. कडेगाव येथे सकाळी 8 वा. सय्यदपिर साहेबहुसेन पिरजादे यांच्या खानकाजवळ सर्व मुस्लीम बांधव एकत्रित येवून नमाजसाठी कडेगाव-निमसोड रस्त्यावरील इदगाह मैदानावर गेले. त्याठिकाणी कडेगाव सुन्नी शाही जामा मस्जिदचे पेश इमाम हाफिज मंजरअली यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक नमाज व खुतबा पठण करण्यात आले. यावेळी कडेगावसह परिसरातील सुमारे पाच हजार हुन अधिक मुस्लीम बांधव एकत्रित आले होते.यावेळी अनेक हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या.
यामध्ये प्रामुख्याने माजी कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख , जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.जितेश कदम, पंचायत समिती सदस्य दिग्विजय कदम, पंचायत समिती सदस्य भुजंगराव माळ,विश्वसंग्राम फाउंडेशनचे संचालक विश्वतेज देशमुख, रायगाव शुगर्सचे चेअरमन रविराज देशमुख, प्रांताधिकारी रणजित भोसले , तहसीलदार डॉ.अजित शेलार, जेष्ठ नेते चंद्रसेन देशमुख,सुरेश थोरात, दीपक भोसले, कडेगांवचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराााध्यक्ष पै. अमोल डांगे, विरोधीपक्ष नेते विजय शिंदे , राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते डी.एस. देशमुख, संतोष डांगे यांच्यासह आदींनी शुभेच्छा दिल्या.

