कडेगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासह सार्वजनिक बांधकाम, महिला व बालकल्याण, आरोग्य व स्वच्छता, पाणीपुरवठा सभापती पदाच्या निवडी जाहीर झाल्या. कडेगाव नगरपंचायतीमध्ये सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष मा.आ.पृथ्वीराज बाबा देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची एकहाती सत्ता आहे, भाजपाचे ११ नगरसेवक तर काँग्रेसचे ५ व राष्ट्रवादीचा १ नगरसेवक आहे. उपनगराध्यक्ष पै. अमोल राजाराम डांगे यांनी ठरलेल्या कालावधी प्रमाणे राजीनामा दिल्याने.भाजपाचे गटनेते नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनच्या शिफारसीने नगरसेविका रंजना लोखंडे यांनी उपनगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज केलेला त्यामुळे कडेगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी रंजना लोखंडे यांची बिनविरोध निवड तर स्थायी समिती सभापती पदी नगराध्यक्ष धनंजय देशमुख, पाणीपुरवठा सभापतीपदी उपनगराध्यक्ष रंजना लोखंडे, सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी पै.अमोल डांगे, आरोग्य स्वच्छता सभापतीपदी निलेश लंगडेे, महिला व बालकल्याण सभापतीपदी शुभदा देशमुख,महिला व बालकल्याण उपसभापती पदी मनीषा राजपूत यांची निवड झाल्याचे निवडणुकीचे पीठासीन तथा निवडणूक अधिकारी डॉ.पवन म्हेत्रे यांनी जाहीर केले.
या निवड प्रक्रियेवेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष रंजना लोखंडे, सार्व. बांधकाम सभापती पै.अमोल डांगे, सभापती,निलेश लंगडे, सभापती शुभदा देशमुख, उपसभापती मनीषा राजपूत,नगरसेवक विजय गायकवाड, नगरसेविका नाजनीन पटेल, नगरसेविका दीपा चव्हाण, नगरसेविका विद्या खाडे, नगरसेविका नजमाबी पठाण, नगरसेवक हनमंत शिंदे, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, श्रीजय देशमुख, सुनील गाडवे,संतोष डांगे, जगदीश लोखंडे, अविनाश लोखंडे, किशोर मिसाळ, राकेश जरग, संभाजी देसाई, अभिजीत लोखंडे, बलजीत लोखंडे, सुहास कराडकर, गणेश लोखंडे, विकास भोसले, वैभव वेल्हाळ यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कडेगांव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी रंजना लोखंडे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर नगरपंचायत प्रांगणामध्ये सत्कार करताना नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका ग्रामस्थ आदी.
दैनिक वचक हे डिजिटल मॅक्झिन असून कडेगाव शहर परिसर व सांगली जिल्ह्यातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सामाजिक, राजकीय किंवा वैयक्तिक समस्या अडचणी यांच्या विषयी निर्भीड व निष्पक्ष लेखणीद्वारे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी उदयकुमार देशमुख यांनी सुरू केलेले डिजिटल मॅक्झिन आहे.