पलुस – कडेगांव भाजप कार्यकर्त्यांचे महाबळेश्वर येथे शिबिर
पृथ्वीराज देशमुखांचे आयोजन, सम्राट महाडीक, शरद लाड अध्यक्षस्थानी
कडेगांव : संपादक (उदयकुमार देशमुख)
पलूस – कडेगांव मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे तीन दिवसांचे पंडित दिनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाबळेश्वर येथे पार पडले. . माजी आमदार व माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी या शिबीराचे आयोजन केले होते.
जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक व शरद (भाऊ) लाड हे या शिबिराच्या अध्यक्षस्थांनी तर रविराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिराची सुरुवात कडेगांव तालुका अध्यक्ष विकास सुर्यवंशी यांनी पक्ष विषयक प्रस्तावना करत केली.
यावेळी सम्राट महाडीक यांनी भाजप सरकारची उपलब्धी या विषयावर मार्गदर्शन केले. देशात राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यापासून देश कणखर बनला असल्याचे सांगितले तर शरद लाड यांनी भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य असल्याचे सांगितले. या पक्षाची कार्यपद्धती बूथ लेवलपासून अगदी देशपातळीपर्यंत अत्यंत नियोजितपणे सुरू असते.

पृथ्वीराज देशमुख यांनी देशात भाजपचे सरकार आल्यापासून देशाची सुरक्षा यंत्रणा मजबूत झाली आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र वाढले आहे. महिलांना, देशातील सर्व घटकांना विविध योजनामार्फत लाभ दिला जात आहे. देश मजबूत झाल्याने आज बाह्य शक्तींची देशाकडे वाईट नजरेने बघण्याचे धाडस होत नाही.
ऍड. विशाल मोहिते यांनी सोशल मीडियाचा वापराविषयी माहिती दिली. मंदाताई करांडे यांनी पक्षाचे वैचारिक स्वरुप मांडले, विजय वरुडकरांनी शासकीय योजनांची माहिती सांगितली, डॉ. सचिन पाटील यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांची विकास कामे तसेच विलास काळेबाग यांनी बुथ संघटन, अनिल लोंढे यांनी कार्यविस्तार या विषयावर मार्गदर्शन केले.
सुरेंद्र चौगुले यांनी पक्षाचा इतिहास, विस्तार याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीमधील पराभवाची कारणे केवळ गाफील पणा असल्याने पुढील काळात सावध भूमिका घेवून मार्गक्रमण करून मतदारसंघात पक्षाची नेटाने बांधणी करून पक्ष विस्ताराची गरज असल्याचे सांगत शिबिराची सांगता केली.
यावेळी जिल्हा चिटणीस जगदीश महाडीक, कडेगाव मंडल अध्यक्ष विकास सुर्यवंशी, पलूस मंडल अध्यक्ष पै. मिलिंद पाटील, पलूस शहर अध्यक्ष संदीप मोरे, नगराध्यक्ष धनंजय भैय्या देशमुख, नगरसेवक अमृत माळी, कडेगांव पंचायत समिती सदस्य पुनम माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

पलूस – कडेगांव मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे तीन दिवसांचे पंडित दिनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाबळेश्वर येथे पार पडले यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शरद लाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आदी.
About the Author
मुख्य संपादक दै. वचक
Author
दैनिक वचक हे डिजिटल मॅक्झिन असून कडेगाव शहर परिसर व सांगली जिल्ह्यातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सामाजिक, राजकीय किंवा वैयक्तिक समस्या अडचणी यांच्या विषयी निर्भीड व निष्पक्ष लेखणीद्वारे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी उदयकुमार देशमुख यांनी सुरू केलेले डिजिटल मॅक्झिन आहे.
