संपादक : उदयकुमार देशमुख
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून खऱ्याअर्थाने भारत देश बदलवला सर्व भेद संपवण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले त्यामुळेच आज भारत प्रगती करतोय या प्रगतीला सर्वाधिक जबाबदार हे भारताचे संविधान आहे. बाबासाहेबांनी भारतीय अर्थकारणाला खऱ्या अर्थाने चालना देण्याचे काम केले आहे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विशिष्ट समाजापुरते मर्यादित नसून त्यांचे विचार हे संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी केले.

ते कडेगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कडेगाव तालुक्याचे युवक काँग्रेसचे नेते हर्षवर्धन कदम, प्रांताधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार अजित शेलार, पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे, कडेगाव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, माजी विरोधी पक्षनेते मा. नगरसेवक उदय कुमार देशमुख, सभापती पै.अमोल डांगे, सभापती निलेश लंगडे,नगरसेवक मनोजकुमार मिसाळ, सागर सकटे, किशोर मिसाळ, शिवलिंग सोनवणे, जीवन करकटे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तंभाचे लोकार्पण करण्यात आल्यानंतर त्यांच्या पवित्र स्मृतीस विविध मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ, डी.एस. देशमुख, राजाराम गरुड, नगरसेवक विजय गायकवाड, नगरसेवक हाजी मुक्तार पटेल, नगरसेविका विद्या विजय खाडे, नगरसेवक विजय शिंदे, नगरसेवक महेश जाधव, नगरसेवक दादासो माळी, नगरसेवक अशपाक पठाण, नगरसेवक संदीप काटकर, नगरसेवक सुधाकर चव्हाण, नगरसेवक अभिजीत लोखंडे, नगरसेवक युवराज राजपूत, उर्दू शाळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इम्तियाज शेख, भाजपा गुंठेवारी समिती सांगली जिल्हा अधक्ष रविराज घाडगे, भाजपाचे कडेगाव शहराध्यक्ष संदीप गायकवाड, जगदीश लोखंडे, प्रवीण करडे, माजी नगरसेवक सागर सूर्यवंशी, माजी सभापती असिफ तांबोळी, विठ्ठल खाडे, संभाजी देसाई, अजित कोळी, शेखर दोडके, संतोष मिसाळ, करण दोडके, अक्षय मिसाळ, अमर मिसाळ, रवी पवार, गणेश भोसले, मुसा इनामदार, पत्रकार हिराजी देशमुख, पत्रकार रजाअली पिरजादे, पत्रकार परवेझ तांबोळी, पत्रकार चेतन सावंत, यांच्यासह असंख्य भीमसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.

कडेगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनच्या १३५ व्या जयंती निमित्त स्तंभाचे लोकार्पण करताना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, हर्षवर्धन कदम, प्रांताधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार अजित शेलार, सहा.पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे,नगराध्यक्ष धनंजय देशमुख, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, नगरसेवक मनोजकुमार मिसाळ, सागर सकटे, किशोर मिसाळ यांच्या सह अन्य.
