- उपसंपादक पत्रकार परवेझ तांबोळी.

संपतराव देशमुख को-ऑप. मिल्क युनियन लि.,कडेपूर (डोंगराई दूध संघ) च्या चेअरमनपदी विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विश्वतेज संग्राम देशमुख तर व्हा.चेअरमनपदी अशोक साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली, निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णयाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. अशोक काकडे तर सहाय्यक प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले सहाय्यक सांगली जिल्हा दुग्ध विकास अधिकारी दीपा खांडेकर होत्या, विद्यमान अध्यक्ष राजकुमार निकम व व्हा चेअरमन चंद्रकांत गोरख पाटील यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या पदावर संचालक मंडळाची सभा बोलविण्यात आली होती. संचालक मंडळाच्या सभेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वतेज देशमुख व व्हा.चेअरमनपदी अशोक साळुंखे यांनची सर्वानुमते निवड झाली.

यावेळी संचालकपदी विजय सयाजी यादव, रमेश निवृत्ती कदम, संजय एकनाथ मोरे, राजकुमार लक्ष्मण कणसे, सुधीर तानाजी जाधव, सुभाष रामचंद्र सूर्यवंशी, प्रकाश भगवान कांबळे, सविता चंद्रकांत पाटील आणि उज्वला आबासो करांडे यांची निवड करण्यात आली. निवडी नंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी टेंभू योजनेचे शिल्पकार स्व.आमदार लोकनेते संपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले नूतन पदाधिकाऱ्यांचा संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संपतराव देशमुख(डोंगराई दूधसंघ)च्या चेअरमनपदी विश्वतेज देशमुख यांनची निवड झाल्यानंतर सत्कार करताना सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व्हा.चेअरमन अशोक साळुंखे यांच्यासह अन्य.

