” टेंभू लाभक्षेत्रापासून वंचित असणार्या भागाला मिळणार पाणी “
” संग्रामसिंह देशमुख यांची शेतकरी ग्रामस्थच्या उपस्थितीत ओगलेवाडी येथील अधिकाऱ्यांशी चर्चा “
( उपसंपादक : पत्रकार परवेझ तांबोळी)
कडेगांव तालुक्यातील टेंभू योजनेच्या पाण्यापासून अद्याप वंचित असलेल्या क्षेत्रास पाणी देण्यासंदर्भात टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या ओगलेवाडी येथिल कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्याशी सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्राम(भाऊ) देशमुख यांनची कडेगाव तालुक्यातील विविध गावातील टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित भागास शाश्वतपणे तात्काळ पाणी उपलब्ध करून विविध समस्यांबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले, यावेळी सदर टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित भागाचा सर्वे करून शाश्वतपणे पाणी मिळण्यासाठी तात्काळ प्रस्ताव शासन दरबारी सादर करून त्यास मान्यता मिळून लवकरात लवकर पाणी देण्याचे आश्वासन राजन डवरी यांनी दिले.

यावेळी कडेगांव तालुक्यातील मौजे कडेपूर येथील गरुड मळा, फडतरे डेअरी, व्यंकटराव यादव वस्ती व बिरोबा मंदिर परिसरास सुर्ली कालवा वितिरिका क्र.११ महालक्ष्मी तलावा मधून, मौजे उपाळे वांगी येथील टेंभू कालव्याच्या पूर्वेस पनाशी, चावराचे माळ, मौजे उपाळे मायणी येथील अंतर्गत बाराभाई क्षेत्र, मौजे वांगरेठरे येथील गावापासून उतरेकडील भाग, आयनांकेचा मळा, मौजे शाळगांव येथील नागुशेठ्चा माळ, वरचा बारखोल,बाळाबापूंचा माळ, खालचा बारखोल,मवट वस्ती, मौजे रायगांव येथील जाधवाचा माळ, वाघाची वस्ती, वाण्याची वस्ती बडवे मळा, रामभाऊ फौजी वस्ती, मौजे शाळगांव येथील शामगांव, रायगांव, विस्तारित योजनेत समाविष्ठ करणे, मौजे आमरापूर येथील खे.वांगी, खे.विटा, आमरापूर, शिवणी फाटा, चेकॉप पाईप लाईन दुरुस्ती, मौजे हणमंतवडिये येथील जि.प. शाळा पाठीमागील भाग, लवंडोबा मळा, मौजे येडे येथील कॅनॉल ते भिलवडी तलाव बंदिस्त पाईप लाईन द्वारे तलावात पाणी सोडणे,

मौजे तोंडोली येथील टेंभू – मेन कॅनॉलच्या पूर्वेला लांडगेवाडी मळा वंचित क्षेत्रासपाणी, मौजे सासपडे येथील गावापासून उत्तर पश्चिम वंचित क्षेत्रासपाणी, मौजे सासपडे येथील गाडेकर मळा मेन पार ते सासपडे ओढा क्षेत्रासपाणी, मौजे तडसर येथील संपूर्णगावास पाणी देणे, मौजे हिंगणगांव खु. येथील गांवचा पश्चिम भाग, सावंत मळा, जाधव मळा, पिराचा मळा, मधला मळा, बकाळकी, म्हसोबाचा मळा क्षेत्रात पाणी, मौजे अपशिंगे येथील गावचा पूर्व, पश्चिम भाग, पानंदी दरे, कासारखोरे, गुळदरा पिंपळ, गुरवकी, विंचू काटा,

मौजे कोतवडे येथील गावचा पूर्व पश्चिम, उत्तर भाग, बंदिस्त पाईप लाईन करणे मौजे शिवाजीनगर येथील पवार रासकर जोडणारा साखव मुख्य वाडा साफ करणे, जुने शिवाजीनगर कॅनॉल गळती काढणे,

मौजे नेर्ली येथील सोनसळ घाट बंदिस्त पाईप लाईन करणे, मौजे नेर्ली येथील बनखडी येथे पूल बांधणे, क्षीरसागर वस्ती बंदिस्त पाईप लाईन करणे, मौजे वडियेरायबाग येथील बनखडी येथे पूल बांधणे,मौजे वडियेरायबाग येथील गणपती माळी घर ते दक्षिणेस ओढ्यापर्यंत बंदिस्त पाईपलाईन करणे, मौजे नेवरी येथील गावांतर्गत कुंभारकी जवळ नवीन दारे काढणे.

मौजे येतगांव येथील खे.वांगी ते आनंदा मास्तर यांची जमीन आणि शंकर सूर्यवंशी जमीन पोटपाट उंची वाढवणे,मौजे खराडे वांगी येथील आकारम सुळे (जगताप)जमीन ते खे.वांगी तलाव बंदिस्त पाईप लाईन करणे,

मौजे खे.वांगी येथील देव नगर वस्ती ते खेराडे वांगी तलाव पाईप लाईन करणे, मौजे कान्हरवाडी येथील डॉ. साळुंखे ते आण्णा वि. पाटील यांचे जमिनीपर्यंत बंदिस्त पाईप लाईन करणे, मौजे कान्हरवाडी येथील लगाडे वस्ती ते नंदू पाटील व लालासाहेब जाधव यांचे जमिनीपर्यंत व शशिकांत साळुंखे ते तुकाराम जोती साळुंखे यांची वस्ती पर्यंत बंदिस्त पाईप लाईन करून टेंभू उपसा सिंचन योजनेद्वारे टेंभू प्रकल्पातून शाश्वतपणे पाणी उपलब्ध होऊन सदर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सदर प्रस्ताव तात्काळ शासन दरबारी सादर होणार असून, हा प्रस्ताव जलदगतीने मंजूर करण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झालेली असून लवकरच संपूर्ण कडेगांव तालुका दुष्काळमुक्त होणार असल्याची माहिती संग्रामसिंह देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली.
या वेळी ओगलेवाडी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्यासह कडेगाव तालुक्यातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

…………..……………………………………………………
कडेगाव तालुक्यातील टेंभू लाभक्षेत्रापासून वंचित असणार्या गावांना पाणी मिळण्यासाठी टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या ओगलेवाडी येथील कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्याशी चर्चा करताना भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख सोबत शेतकरी ग्रामस्थ आदी….
” …….कॅबिनेट मंत्रीपदाला लाथ मारत दुष्काळी भागाला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी टेंभू योजना पदरात पाडून घेणारे दिवंगत नेते लोकनेते आमदार संपतराव देशमुख यांच्या पावलावर पाव ठेवत संग्रामभाऊ देशमुख हे कडेगांव तालुक्यातील इंच ना इंच जमीन टेंभूच्या पाण्याने ओलिताखाली आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असून लवकरच ते स्व.आण्णाचे स्वप्न साकारतील……..”
विलास(तात्या)गरुड,
अँड .सत्यजित यादव-देशमुख कडेपूर
संजय माने (आबा) मा.सरपंच उपाळे वांगी.
