उपसंपादक: परवेझ तांबोळी
अंत्योदय, सशक्त व संस्कारित-वैचारिक भारत हे ध्येय समोर ठेवत ६ एप्रिल १९८० ला भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची स्थापना झाली होती.स्थापना दिवसानिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांच्या कडेपूर येथील निवासस्थानी जनसंपर्क कार्यालयात रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती, संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कडेगांव पंचायत समिती सदस्य पुनम माळी यांच्या हस्ते भाजपाच्या ध्वजाचे पूजन करून ज्येष्ठ नेते श्रीरंग चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहन करून भाजपचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
भाजपा ध्वज पूजन व ध्वजारोहनानंतर सामूहिक वंदे मातरम् राष्ट्रीयगीताचा पठण करून कार्यकर्त्यांनी आपसात मिठाई वाटप करून एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.

यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भाजपा राज्य कार्यकायरणी सदस्य राजाराम गरुड, भाजपा किसान मोर्चा सांगली जिल्हाध्यक्ष अँड.विशाल मोहिते, कडेगांवचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, सभापती पै.अमोल डांगे, निलेश लंगडे, नगरसेवक विजय गायकवाड, भाजपा कडेगांव शहाराध्यक्ष संदीप गायकवाड, माजी तालुकाध्यक्ष अशोक साळुंखे,हनमंतराव कदम, वसंत महाडिक,बाळासाहेब धनवडे, प्रकाश गायकवाड, चंद्रकांत पाटील, बापूराव पवार, चंद्रकांत मोरे, विकास भोसले, सुनील मोहिते, संजय मोरे, मोहन मोरे, अशोक मुळीक, धनंजय कुंभार, रोहित कांबळे, विशाल सूर्यवंशी, पोपट मोरे, संग्राम पाटील, प्रतापराव यादव, सयाजी चव्हाण, संजय माने, संग्राम घार्गे, माणिक मोरे, सिकंदर मुजावर, अभिजीत सावंत, जितेंद्र मोहिते, जगदीश लोखंडे, संतोष माने, भगवान कदम,सचिन कदम, संतोष कदम, संदीप महाडीक, सागर सूर्यवंशी,अजित यादव,विकास माने, सचिन जगताप, अनिल मोहिते, महेश जानकर, रवींद्र सूर्यवंशी, करीम पटेल, मोहसीन तांबोळी, अनिल रेणूशे, दादा चव्हाण, राजू भोगे, आबाजी माने, ऋतूराज देशमुख, अमोल कांबळे, धनाजी जाधव,अनिल जगताप, आशिष मोरे, हनमंत नवाळे, अजित मोरे, सूर्याची पाटील, अमोल मोरे, राजेंद्र यादव, संदीप मोहिते, गणा आबा, महादेव मुळीक, संजय डोंब त्यांच्यासह भाजपाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते प्रमुख उपस्थित होते.

कडेपूर ता. कडेगांव येथील संग्रामसिंह देशमुख यांच्या निवासस्थानी जनसंपर्क कार्यालयात भाजपाचा ४६ वा वर्धापन दिवस साजरा करताना संग्रामसिंह देशमुख यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी.
