कडेगांव : वार्ताहर.
पलुस कडेगांव मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रबिंदू मानून डॉ.पतंगराव कदम व मोहनराव कदम यांनी काम केले आहे. त्याचप्रमाणे यापुढेही काळात सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रबिंदू काम करणार आहे. मतदार संघातील जनतेने लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत कदम कुटुंबीय व काँग्रेसवर विश्वास ठेवत जो कौल दिला आहे त्याला कधी ही तडा जाऊ देणार नसून कोणतेच विकासकाम शिल्लक ठेवणार नसून काँग्रेस पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी केले.
ते खंबाळे औंध ता. कडेगांव येथील भाजपाचे युवा नेते माजी ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष रविंद्र दुबिले, गणेश दुबिले, नानासो दुबिले, मनोज दुबिले, अशोक दुबिले, शिवाजी दुबिले, जीवन घाडगे, किरण खराडे, निलेश पाटील, विकास गुरव या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांच्या काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेशावेळी बोलत होते.
यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन शांताराम (बापू) कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र(आप्पा) लाड, पंचायत समिती सदस्य पै.रणजीत पवार प्रमुख उपस्थित होते.
भाजपाच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करत आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजपाला खिंडार पडले असून काँग्रेसची ताकत वाढली आहे.
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांचा मंत्री आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी काँग्रेस पक्षाच्या कुटुंबात स्वागत करून आगामी काळात सर्वच ठिकाणी काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ . कदम यांनी केले.

खंबाळे(औंध) ता.कडेगाव येथील भाजपा कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करताना आ.डॉ.विश्वजीत कदम, शांताराम कदम, महेंद्र आप्पा लाड व मान्यवर….
