कडेपूर : प्रतिनिधी.
कडेगांव तालुक्यातील मौजे कडेपूर गावच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या व महाराष्ट्र सह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री. डोंगराई देवी तीर्थक्षेत्र मंदिराच्या सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन पर्यटन विभागाकडे पाठपुरावा केला होता.तात्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष सहकार्याने ६.५ कोटीचा प्रोजेक्ट मंजूर झाला होता, त्यातील पहिल्या टप्प्यातील १.५ कोटीचे काम पूर्णत्वास असून चालू वर्षी २०२६-२७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली.

वन व पर्यटन विभागाअंतर्गत ३५.७१ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपाचे पलूस कडेगांव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह संपतराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संग्रामसिंह देशमुख म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार सर्वसामान्य जनतेचा उत्कर्ष साधण्याचे काम करत आहे, पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत व यापुढेही केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून लागेल तितका निधी मंजूर करून आणणार असल्याची माहिती यावेळी संग्रामसिंह देशमुख यांनी दिली.
” श्री डोंगराई देवी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, वनमंत्री गणेशजी नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत(दादा)पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.”

